RTE ऍडमिशन 2026 ची जी काही यादी आहे ती आता आलेली आहे. तुमची निवड झालेली आहे की नाही तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून सुद्धा चेक करता येणार आहे. तुमचं नाव कसं चेक करावे, तुमचा नंबर लागला की नाही, नंबर लागला तर नक्की काय करावे व नंबर नाही लागला तर काय करावे चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. वेबसाईटवरती पालकांसाठी ज्या सूचना लागलेल्या आहेत त्या अगोदर व्यवस्थित नीट वाचून घ्या. वेबसाईटवरती जाण्यासाठी येथे क्लिक करा.
सूचना–
- List No.1 लागलेली आहे. दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे.
- निवड यादीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी आपल्या अलॉटमेंट लेटर व हमी पत्राची प्रिंट काढावी. तसेच अर्ज भरताना जी काही कागदपत्रे नोंदवली होती त्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व साक्षांकित प्रत घेऊन पडताळणी समिती आहे त्यांच्याकडे जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.
- RTE ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी जे बालक पात्र आहेत त्या पालकांच्या मोबाईल नंबरवरती एसएमएस येईल, कधी येणार नाही त्यामुळे पालकांनी फक्त एसएमएस वरती अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवरती क्लिक करुन अर्जाची स्थिती पहावी.
- ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवरती दिलेल्या अर्जाची स्थिती या पर्यायाचा वापर करावा.
- अर्ज भरताना जी काही कागदपत्रे नोंदवली आहेत त्या कागदपत्रांच्या मूळ प्रत व साक्षांकित प्रत पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीच्या आत निश्चित करावी व याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे गरजेचे आहे.
- ज्यांचे निवड यादीमध्ये नाव लागले नाही परंतु प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे त्यांनी आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे एसएमएस पाठवण्यात येतील.
मूळ निवड यादी पाहण्याची पद्धत–
- सदर यादी पाहण्यासाठी मूळ निवड यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यामध्ये Selection List No. या ठिकाणी Selection List 1 निवडायची आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे व पुढे Go या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमचे नाव लागले आहे की नाही हे चेक करू शकता. परंतु येथे भरपूर पेजेस असल्यामुळे तुमचे नाव तुम्हाला लवकर सापडणार नाही. त्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती पुढे सांगते.
- ज्यांचे मूळ यादीमध्ये नाव नाही ते आपले नाव प्रतीक्षा यादीमध्ये चेक करू शकतात.
प्रतीक्षा यादीमध्ये नाव चेक करण्याची पद्धत-
- सदर यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी Waiting List म्हणजेच प्रतीक्षा यादी या पर्यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यामध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे व Go बटणावर क्लिक करायचे आहे.
लवकर नाव शोधण्याची पद्धत-
- त्यासाठी Application Wise Details म्हणजे अर्जाची स्थिती या पर्यायावरती क्लिक करावे.
- त्यामध्ये Application No. म्हणजेच अर्ज क्रमांक टाका व Go या पर्यायावरती क्लिक करा.
- तेथे खाली तुम्हाला दिसेल नंबर लागलेला आहे की नाही. जर नंबर लागला असेल तर Allocated- Yes असे दिसेल व Admit Card देखील येईल.
- नंबर लागला नसेल तर Not Allocated असे दिसेल. नंबर नसेल लागला तर तुम्ही प्रतीक्षा यादीसाठी वाट पाहू शकता.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

