आज आपण सदर लेखातून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS) प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सहकार मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु याचा शेतकरी कर्जमाफीवरती कसा परिणाम होणार हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे. या योजनेची व कर्जमाफीची काय लिंक आहे तसेच एकरकमी कर्जमाफी योजना कशी राबवली जाणार आहे या दोन्ही अपडेट आज आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्याअंतर्गत दिनांक 30 जून 2023 अखेर पर्यंतची थकीत पीक कर्जे तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अल्पमुदत कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज व शेतकऱ्यांचे सोसायटीकडील कर्ज या कर्जांचा समावेश करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये काय? असा प्रश्न पडला असेल. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत कर्ज घेतले जाणार आहे, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. यासाठी घटीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही आणि हे सर्व असताना 30 जून 2023 पर्यंतच्या पीक कर्जाला जर OTS योजना राबवली जात असेल तर मात्र याचा अर्थ काय आहे हे समजत नाही.
जेव्हा राज्यात कर्जमाफी योजना राबवली जाते तेव्हा सोसायटीकडे जे थकीत कर्ज असलेले शेतकरी असतात त्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो आणि आता या शेतकऱ्यांचे 30 जून 2023 पर्यंत थकीत असलेले कर्ज जर एकरकमी परतफेड योजनेत घेतले जात असतील तर मग कर्जमाफी नेमकी कधीपासून देण्यात येणार आहे? त्याचबरोबर एप्रिल 2023 नंतरचे कर्ज हे कर्जमाफीमध्ये घेतली जाणार का? या संदर्भाचा कोणताही जीआर किंवा अपडेट आलेली नाही. परंतु या एकरकमी कर्ज परतफेड परतफेड योजनेला हा कालावधी दिल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही एकरकमी कर्ज परतफेड योजना पुढील एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे व संस्था योजना स्वीकारल्यानंतर सभासदांनी एक महिन्याच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.
जिल्हा पातळीवरील देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करून योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यातील अनेक प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था अनिष्ट तफावतीमध्ये असल्यामुळे सभासदांना कर्ज पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या संस्थांना इष्ट तफावतीत आणण्यासाठी सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यपद्धती, पात्रता निकष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विकास संस्थांची भूमिका याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. यावेळी कर्जदारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या अटी, अर्जाची छाननी व मंजुरीची कार्यपद्धती यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन तत्त्वावरही विचार विनिमय करण्यात आलेला आहे.
बैठकीत प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था व विकास संस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांचा पतदर्जा सुधारावा, संस्था स्तरावरील कर्जवसुलीला चालना मिळावी, संस्थास्तरावरील कर्ज तफावत कमी व्हावी तसेच सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. या योजनेच्या अंतर्गत दिनांक 30 जून 2023 अखेर पर्यंतची थकीत पीक कर्जे तसेच मध्यम व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. एका सभासदाकडे एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास ती सर्व खाती योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ही योजना सुरुवातीस एक वर्षासाठी लागू राहणार आहे संस्था योजना स्वीकारल्यानंतर सभासदांनी एक महिन्याच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करताना एकूण थकबाकीच्या 10 टक्के रक्कम जमा केलेल्या चलनाची प्रत जोडणे गरजेचे असणार आहे.
उर्वरित रकमेचा भरणा अर्ज मंजुरीनंतर संस्थेच्या सूचनेप्रमाणे करावा लागणार आहे. मूळ कर्जदार सभासद मयत असल्यास किंवा अर्ज करण्यास सक्षम नसल्यास त्याच्या वारसांना अर्ज करता येणार आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या माध्यमातून कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार असून फक्त मुद्दलाची रक्कम अदा करणे बंधनकारक असणार आहे. या योजनेनुसार पीक कर्जावरील थकीत मुद्दलावर 6 टक्के सरळ व्याज, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जावरील थकीत हप्त्यावर 8 टक्के सरळ व्याज आकारण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना साहजिकच होणार आहे, परंतु ही योजना राबवली जात असताना जी काही तारीख देण्यात आलेली आहे ही तारीख मात्र शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

