शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर?

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे. माजी सनद अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे.

कर्जमाफी देताना याचा ही विचार होणार?-

ही कर्जमाफी देताना सहकार विभागामातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीचा पिकांसाठीचा वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित एफआरपी मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येत आहे. परंतु ही फक्त सुत्रांची माहिती आहे.

ही समिती साधारणपणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. आत्तापर्यंत तरी यामध्ये मुदतवाढ मागण्यात आलेली नाही. या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात येईल व पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडण्यात येईल. यामध्ये देण्यात आलेली निकष, अटी, शर्ती कोणत्या असतील व काय काय उपाययोजना करण्यास सुचवल्या जातील या सर्वांचा आधारे पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्या काही पात्रता असतील त्या पात्रतेचा जीआर निर्गमित करण्यात येईल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या समितीचा अहवाल येण्यासाठी एप्रिलचा तिसरा आठवडा लागणार आहे.

त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल म्हणजे जो जीआर आपण एप्रिलमध्ये येईल असे समजत होतो तो आता मे मध्ये देखील येऊ शकतो. या योजनेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या अटी, शर्ती व पात्रता या योजनेचा जोपर्यंत जीआर येत नाही तोपर्यंत फक्त बातम्या असणार आहेत. त्यामुळे जीआर येण्याची वाट पहावी आणि जीआर आल्यानंतर शेतकऱ्यांना या संदर्भातील अटी, शर्ती, पात्रता व निकष हे समजणार आहेत. जे जे अपडेट येतील ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनेलवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *