या योजनेच्या माध्यमातून फक्त 100 रुपयांमध्ये दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते?

आजही देशभरामध्ये मोठ्या संख्येने लोकांकडे कायमस्वरूपी नोकरी नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत वृद्धपकाळाची चिंता असलेल्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते.

सदर योजना नक्की आहे तरी कोणती?-

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून ज्यांचे उत्पन्न 15000 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व संघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धकाळात पेन्शन दिली जाते. नोकरदारांना निवृत्तीवेतन पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो. परंतु असंघटित क्षेत्रातील कामगारांना अशी कोणती सुविधा मिळत नाही.

सदर योजनेची पात्रता-

पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, वीटभट्टी कामगार, दैनंदिन सफाई कामगार, गवंडी,, घरकाम करणारे, भाजीविक्रेते इत्यादींना मिळू शकतो. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. असंघटित म्हणजे ज्या भागात रोज कमावण्याची व खाण्याची व्यवस्था चालते. निश्चित पगार निश्चित रजा किंवा पेन्शन नाही. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल जे ईपीएफओ, एनपीएस, ईएसआयसी सारख्या योजनांचा लाभ घेत नाहीत.

सदर योजनेच्या माध्यमातून कोणाला किती पेन्शन मिळेल?-

  • जर लाभार्थ्याचे वय 18 वर्ष असेल तर 60 वर्षापासून त्याला 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
  • जर लाभार्थ्याचे वय 29 वर्ष असेल तर त्याला 60 वर्षाच्या वयापासून 3000 रुपये पेन्शनसाठी दरमहा 100 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.
  • जर लाभार्थ्याचे वय 40 वर्ष असेल तर त्याला वयाच्या 60 वर्षापासून 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 200 रुपये प्रीमियम जमा करावा लागणार आहे. 

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

तुमचे आधार कार्ड व बचत बँक खात्याचे पासबुक, तसेच बँकेकडून हप्त्यांच्या कपातीसाठी ऑटो-डेबिटला अधिकृत करणारा एक फॉर्म.

सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन भेट देऊन पीएमएसवायएम (PM-SYM) योजनेसाठी अर्ज करू शकता. किंवा तुम्ही एलआयसी (LIC), ईपीएफओ (EPFO) किंवा ईएसआयसी (ESIC) कार्यालयात नोंदणी करून वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन मिळू शकतात.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *