आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची अनेक महिलांनी ई-केवायसी करून देखील पैसा जमा झालेले नाहीत. महिला पात्र आहेत, केवायसी देखील व्यवस्थित केलेली आहे, परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता या महिला तक्रार करू शकतात.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा न झाल्यास काय करावे?-
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते तक्रार करू शकतात. महिला जर पात्र असतील, ई-केवायसी देखील पूर्ण केलेली असेल तर त्या याबाबतची तक्रार देऊ शकतात. संबंधित महिलांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबतीमध्ये माहिती द्यायची आहे. तेथे तक्रार करायची आहे. तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही, ई-केवायसी केली की नाही याबाबत माहिती घेऊन तुमचा लाभ परत सुरू केला जाईल. महिलांना पुन्हा एकदा 1500 रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही तक्रार करू शकतात.
लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी-
अनेक महिलांनी ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांनी पुन्हा एकदा ई-केवायसी करून त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. जर तुम्ही दुरुस्ती केली असेल तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या योजनेत केवळ दुरुस्ती केलेल्या महिलांना तीन महिन्याचा एकत्र लाभ दिला जाणार आहे. यासाठी 31 एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. त्यानंतर महिलांला एकत्र हप्ता दिला जाणार आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

