संगणकीय प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा गुरुवारपासून (दि. 2) ते रविवारपर्यंत (दि.5) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड व इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिलेली आहे. या कालावधीत महाभूमी पोर्टल व भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व 8-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा पूर्ण बंद राहणार आहेत.
कालावधी-
सुरू होण्याची वेळ:
गुरुवारी, दिनांक 2 एप्रिल 2026 (रात्री 11:59 वाजेपासून)
समाप्तीची वेळ:
रविवारी, दिनांक 5 एप्रिल 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
प्रभावित होणाऱ्या सेवा-
भूमी अभिलेख व महाभूमी पोर्टल वरील सर्व सेवा जसे की 7/12, प्रॉपर्टी कार्ड, क प्रत, फेरफार (डिजिटल साईन व View Only) तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा व GRB Portal वरील सर्व सेवा बंद राहणार आहेत.
सूचना-
तांत्रिक कामामुळे सेवा खंडित होत असल्याने नागरिकांनी आपली नियोजित कामे या कालावधीच्या अगोदर किंवा नंतर पूर्ण करावी. सोमवारी 6 एप्रिल 2026 पासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

