लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ?

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचा लाभ तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेला आहे, त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे.

अनेक महिलांनी केवायसी करताना केली चूक-

31 डिसेंबर 2025 अगोदर ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. यामध्ये महिलांनी लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्या नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील; किंवा सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्यांना लाभ मिळत नाही. नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे शासनाने पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्यांचा अवधी उपलब्ध करून दिला होता.

ती मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आलेली होती. हीच मुदत आता पुन्हा एका महिन्याने वाढवण्यात आलेली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे. ही अंतिम मुदत देण्यात आलेली असून आता प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींना बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होणार नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *