मागील अनेक दिवसांपासून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांच्या अनुदानाची वाट पाहत आहेत. हळूहळू काही योजनांसाठी निधीची उणीव भरून काढण्यात येत आहे. परंतु तत्पूर्वी महाडीबीटी अनुदान वितरणांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजना राबवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले जातात. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधी नुसार महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीरण/इतर घटकांतर्गत निवड केली जाते.
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित घटक खरेदी केल्यानंतर अनुदान वितरण केले जाते. सदर योजनांमध्ये या अगोदर अकाउंट बेस व आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान जमा करण्यात येत होते. परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2026 पासून आधार बेस पेमेंट पद्धत वापरण्याच्या सूचना कृषी विभागास प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरील योजनांचे अनुदान वितरण हे आधार बेस पद्धतीनेच होणार आहे.
म्हणजेच आता यापुढे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना जोडलेल्या बँक खात्याऐवजी लाभार्थी यांच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये योजनांचे अनुदान जमा होणार आहे. यासंदर्भात लाभार्थ्यांना केल्या जाणाऱ्या खाते- आधारित (अकाउंट बेस) देयकांची प्रक्रिया 1 एप्रिल 2026 पासून PFMS द्वारे केली जाणार नाही, याची खात्री करावी. तर दिनांक 1 एप्रिल 2026 पासून सर्व लाभार्थ्यांचे अनुदान अदा आधार बेस अप्रुवल घेऊनच करावे, असे सांगण्यात आलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

