सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागात SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नावे SIR मध्ये नसतील त्यांचे नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. SIR म्हणजे नक्की काय? 2002 च्या लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही? तसेच आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव कसे ऍड करायची याची संपूर्ण माहिती चला तर मग जाणून घेऊया.
सर्वात आधी आपण या SIR म्हणजे काय हे जाणून घेऊया?-
Special Intensive Revision म्हणजेच SIR. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मतदार यादी दुरुस्ती करणे. परंतु याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात व नवीन मतदार यादीमध्ये ऍड केले जातात. अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.
या प्रक्रियेत नक्की काय होते-
बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करून घेतात. काही बदल करायचा असेल तर आवश्यक फॉर्म भरून घेतात. मृत व्यक्तीची किंवा स्थलांतरित झाल्यांची नावे यादीतून वगळून टाकतात. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट करतात. 2002 च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही? कसे पहावे? सर्वात अगोदर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जायचे आहे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अँप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर लॉगिन करून घ्यायचे आहे.
आता त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.
1. Search your name in SIR यावर क्लिक करायचे आहे. तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदार संघ टाकून तुमचे नाव या यादीत आहे की नाही हे चेक करायचे आहे.
2. आणि दुसरे ऑप्शन आहे Last SIR E-Roll यावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला VIEW यावर क्लिक करायचे आहे . यानंतर तुमच्या समोर लिस्ट आली असेल त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव ॲड करावे लागणार आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमच मतदारकार्ड, आधार कार्ड व तुमच्या पालकाचे नाव 2002 च्या यादीत असणे बंधनकारक आहे. बीएलओ पडताळणीसाठी तुमच्या घरी आले व त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावरती आता राहत नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.
नोट-महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

