31 मार्चपर्यंत ही 10 कामे नक्की करा?

आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेला आहोत. 31 मार्च अगोदर ही 10 कामे करा नाहीतर तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया ही नक्की 10 कामे आहेत तरी कोणती?

  • सर्वात पहिले काम म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती आत्तापर्यंत केलेली नसेल तर त्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्या अगोदर ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • दुसर काम म्हणजे जर रेशनकार्डची ई-केवायसी आत्तापर्यंत केलेली नसेल तर ती मार्च अखेरपर्यंत करून घ्या.
  • तिसर काम म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ती करून घ्या.
  • चौथ काम म्हणजे तुमच्या गाडीच्या FAST Tag ची ई-केवायसी राहिली असेल तर ती लवकरात लवकर करून घ्या.
  • पाचव काम म्हणजे जर तुम्ही पॅन कार्ड काढले नसेल तर 31 मार्च 2026 पर्यंत लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या. कारण जर तुम्ही 31 मार्चअगोदर पॅन कार्ड काढले तर ते फक्त आधार कार्डच्या माध्यमातून काढता येणार आहे. 31 मार्चनंतर पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जन्माचा पुरावा म्हणून विविध कागदपत्रे लागणार आहेत.
  • सहावे काम म्हणजे तुमचे जर PPS/NPS/सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट असेल तर मार्च महिना संपत आलेला आहे लवकरात लवकर आपला हप्ता असेल तर तो भरून टाकावा. ज्यामुळे तुमचे खाते चालू राहील.
  • सातवे का म्हणजे जर तुमचे DEMAT अकाउंट (म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटसाठी) असेल तर त्याला NOMINEE ADD केलेला आहे की नाही हे चेक करून घ्या.
  • आठवे काम आहे ते म्हणजे जर तुमचे बँक लॉकर असेल तर ते मार्च एंड पर्यंत रिन्यूअल करून घ्या.
  • नववे काम म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या क्रेडिट कार्डवरती काही रिवॉर्ड्स पॉईंट मिळत असतात ते मार्च महिन्यात संपत असतात, त्यामुळे मार्च अखेरीस ते वापरून घ्या.
  • दहाव काम आहे तुमच्या बँक खात्यामध्ये हजार ते दोन हजार रुपये शिल्लक ठेवावी. ज्यामुळे जे SMS चार्जेस असतात, एटीएम चार्जेस असतात, विमा चार्जेस असतात किंवा इंटरनेट बँकिंग चार्जेस असतात ते कट होत राहतात.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *