पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये मोबदला मिळणार?

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या 3 हजार एकर जमिनीसाठी 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले गेलेले आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये या निधीतून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणारा परतावा हा एरोसिटीमध्येच दिला जाणार आहे. ही एरोसिटीविमानतळाच्या शेजारीच उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. डुडी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गेल्या दहा तारखेला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या 6 हजार कोटींच्या निधीसाठी कर्ज उभारणीस मान्यता दिलेली आहे.

हे कर्ज उभारणीसाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना केली गेलेली आहे. त्यामध्ये एमआयडीसी, एमएडीसी व सिडको यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या तीन संस्थांमध्ये सिडकोचा सर्वाधिक भाग असणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा राज्य शासन घेणार आहे. या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी कर्ज उभारणीस आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर या निधीतून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.

96% क्षेत्राला संमती-

या विमानतळासाठी फक्त मोजणीसाठी संमती देण्यात आली होती. भूसंपादनाची संमती देण्यात आली नव्हती असा काही शेतकऱ्यांचा दावा होता. परंतु भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी देण्यात येते. त्यामुळे एकूण क्षेत्रापैकी सुमारे 26 टक्के क्षेत्राची संमती मिळालेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मोबदल्याची वाटप करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे.

एरोसिटीतच परतावा-

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दहा टक्के विकसित जमिनीचा परतावा हा एरोसिटीमध्ये देण्यात येणारा असून तीन हजार एकर क्षेत्रात विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याशेजारील क्षेत्रामध्ये एरोसिटी उभारली जाणार आहे. त्यासाठीची आवश्यक काही जमीन ताब्यात आलेली आहे. काही जमीन अजून ताब्यात आलेली नाही त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना एरोसिटीतच परतावा मिळणार आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर नक्की शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *