लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आज पासून जमा होण्यास सुरुवात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. जानेवारी महिन्याचा सन्माननिधी दीड हजार रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून (23 फेब्रुवारी 2026) पासून सुरुवात झालेली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यातील या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

खात्यामध्ये पैसे आले की नाही कसे चेक करावे?

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट बँक हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे जमा करण्यात येतात. जर तुमचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल.
  • जर मेसेज आला नाही तर बँकेच्या ॲपमध्ये जाऊन तेथे डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करून खात्यात पैसे जमा झालेले आहेत की नाही हे चेक करता येते.
  • तसेच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे मिळाले आहे की नाही हे चेक करू शकता.
  • त्याचबरोबर तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ‘अर्जदार लॉगिन’ या पर्यायावर क्लिक करून अर्जाची सद्यस्थिती सहजपणे पाहू शकता. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवरती ‘Payment Status’ हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे. यामध्ये आपला हप्ता आला की नाही याची संपूर्ण माहिती समोर येते.
  • ज्या महिलांना इंटरनेटचा वापर करणे शक्य नाही त्यांनी जवळच्या CSC केंद्रावर जाऊन माहिती घ्यावी किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्यावे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *