शासनाच्यामार्फत आरटीई अंतर्गत 25% मोफत प्रवेश ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व वंचित गटातील मुलांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. या योजनेची 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पालकांना योग्य माहिती व कागदपत्रांसह अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या संदर्भातील पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व लॉटरी नियम.
तसेच अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार खाजगी शाळांनी इयत्ता पहिली (किंवा पूर्वप्राथमिक) प्रवेशात 25% जागा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. यालाच आरटीई अंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेश असे म्हटले जाते. या अंतर्गत शाळेची फी पूर्णपणे शासन भरते, प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असते व निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
सदर अर्जाची महत्त्वाची माहिती-
- अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 10 मार्च 2026 आहे.
- फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळा उपलब्ध असणार आहेत.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.
- Google Location अचूक भरावे लागणार आहे.
- चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होणार आहे.
- पालकांनी अर्ज सबमिट करण्याअगोदर सर्व माहिती पुन्हा तपासावी. कारण एकदा जन्मतारीख भरल्यानंतर ती बदलता येणार नाही.
सदर अर्जाची पात्रता-
आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटक(EWS):
- वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखांपेक्षा कमी
- उत्पन्नचा दाखला गरजेचा
सामाजिक वंचित गट:
- जात प्रमाणपत्र गरजेचे
- इतर राज्यातील जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
घटस्फोटीत / न्यायप्रविष्ट महिला:
- न्यायालयाचा आदेश गरजेचा
- राहत्या पत्त्याचा पुरावा गरजेचा
विधवा महिला:
- पतीचा मृत्यूचा दाखला गरजेचा
- उत्पन्नाचा प्रमाणपत्र असणे गरजेचे
अनाथ मुले:
- अनाथालय कागदपत्रे व पालक हमीपत्र गरजेचे
दिव्यांग मुले:
- किमान 40 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र गरजेचे
कोविड प्रभावित मुले (1 एप्रिल 2020-31 मार्च 2022):
- मृत्यू प्रमाणपत्र गरजेचे
- वैद्यकीय प्रमाणपत्र (फॉर्म 4) गरजेचा
सदर अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
जन्मतारीख पुरावा:
- ग्रामपंचायत / महानगरपालिका दाखला
- ANM रजिस्टर नोंद
- अंगणवाडी नोंद
राहण्याचा पुरावा:
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- विज बिल / पाणीपट्टी
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- भाडेकरार (नोंदणीकृत, किमान 11 महिने)
आधार कार्ड:
- विद्यार्थी व पालकांचे गरजेचे
- नसल्यास 90 दिवसात सादर करणे बंधनकारक
उत्पन्नाचा दाखला (EWS साठी)
सदर अर्ज करण्याची प्रक्रिया-
- आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
- त्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा.
- त्यामध्ये मुलाची जन्मतारीख प्रमाणपत्रानुसार भरावी.
- अचूक पत्ता भरावा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- सबमिट करण्याअगोदर माहिती तपासावी.
- अर्ज क्रमांक जतन करून ठेवावा.
- डुप्लिकेट अर्ज भरू नये. दोन अर्ज आढळले तर दोन्ही अर्ज रद्द होणार आहेत.
नंतरची प्रक्रिया-
- सर्व अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे.
- पात्र अर्जांची संगणकीय लॉटरी लागणार आहे.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस किंवा वेबसाईटवरती माहिती देण्यात येणार आहे.
- लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश रद्द होतो.
महत्त्वाच्या सूचना-
- खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द होणार आहे.
- Location चुकीचे टाकले तर शाळा उपलब्ध होणार नाही.
- पासवर्ड विसरल्यास Recover Password वापरावा.
- अर्जाची प्रत व मोबाईल नंबर जतन करून ठेवावा.
- त्यामुळे पालकांनी घाई न करता सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.

