रेशन कार्डवरती नक्की कोणते धान्य मिळणार तांदूळ की मका?

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याचे उत्पादन हे बऱ्यापैकी झालेले आहे. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हासोबत तांदळाऐवजी मका दिली जात आहे. पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशनवर तांदूळ मिळणार की नाही याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे, मात्र पुणे जिल्ह्यात अगोदरप्रमाणेच गहू व तांदूळ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा संभ्रम दूर झालेला आहे.

घरात थप्पी; रेशनच्या मक्याचे करायचे काय?-

राज्यातील काही जिल्ह्यात मका वाटप सुरू करण्यात आलेली आहे. तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आधीच मका पिकते तर घरातही मक्याच्या थाप्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये रेशनवर पुन्हा मकाच मिळणार असल्याने त्याचे काय करावे? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

लाभार्थी म्हणतात आम्हाला तांदूळच हवंय?-

रेशनवरील तांदूळ हा गरीब कुटुंबाच्या रोजच्या आहारातला मुख्य भाग आहे. आम्हाला मका नको, आमचा तांदूळ बंद करू नका, असे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

पुणे जिल्ह्यात मका नाही, तांदूळ मिळणार?-

राज्यातील काही भागात मका वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु पुणे जिल्ह्यात अद्याप तशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच गहू व तांदळाचे वितरण सुरू राहणार आहे.

कार्डधारकांना मिळणारा धान्याचा कोठा-

प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू 3 किलो तर तांदूळ 2 किलो प्रति सदस्य असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्य दिले जाते. अंत्योदय योजनेच्या माध्यमातून 21 किलो गहू तर 14 किलो तांदूळ प्रत्येक कार्डवर देण्यात येते.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *