लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. परंतु फेब्रुवारी 2026 च्या मध्यापर्यंत जानेवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. आता फेब्रुवारी महिना संपण्यासाठी फक्त दहा ते बारा दिवस उरले असताना महिलांमध्ये प्रतिक्षा व चिंता वाढली होती.

ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका किंवा तांत्रिक अडचणी यामुळे डिसेंबर 2025 पासून अनेक महिलांच्या हप्ते रखडले आहेत. नवीन आर्थिक वर्ष व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. शासनाच्या माध्यमातून जानेवारी हप्त्याबद्दल जीआर काढण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की जीआर मध्ये काय म्हटलेले आहे.

शासन निर्णय नक्की काय आहे-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये निधी वितरण करण्याबाबत 18 फेब्रुवारी 2026 रोजी जीआर काढण्यात आलेला आहे.

  • वित्त विभागाच्या संदर्भातील दि. 07-04-2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी (2235डी767) या लेखाशीर्षाखाली 31-सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रु. 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
  • तसेच त्यासोबत सांगण्यात आलेले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी.
  • म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, फक्त जानेवारी महिन्याचा हप्ताच येत्या चार ते पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *