महाराष्ट्र शासनाने शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय (जीआर) जारी केलेला आहे. या नवीन आदेशानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग(SEBC) प्रवर्गअंतर्गत मुस्लिम समाजाला देण्यात येणारा लाभ यापुढे लागू राहणार नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा निर्णय कायदेशीर व प्रक्रियात्मक कारणांमुळे घेण्यात आलेला आहे.
वर्ष 2014 मध्ये अध्यदेशाद्वारे मुस्लिम समाजातील काही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्यात आले होते. परंतु त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये या आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच हा अध्यादेश निर्धारित कालावधीत कायद्यात रूपांतरित करता आला नाही. परिणामी तो आपोआपच निष्प्रभ ठरला. SEBC चौकटीअंतर्गत राज्य शासनाने या अगोदर स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी-ए (SBC-A) हा स्वतंत्र प्रवर्ग तयार केला होता. या प्रवर्गामध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास मुस्लिम घटकांना सरकारी व निमसरकारी सेवांमधील थेट भरती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान 5 टक्के आरक्षण देण्यात येत होते.
परंतु नवीन आदेशानुसार या प्रवर्गातील लाभ तात्काळ थांबवण्यात आलेला आहे. तसेच मुस्लिम अर्जदारांना देण्यात येणारी जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रियेला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे. मुस्लिम आरक्षणाची ही तरतूद जुलै 2014 मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम या दोन्ही समाजांसाठी आरक्षण जाहीर केलेले होते. मराठा समाजाला 16% तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का सुमारे 73 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळात माडला होता. शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नवीन जीआरनुसार 23 डिसेंबर 2014 रोजी घेतलेला आरक्षणासंदर्भातील निर्णय आता प्रभावी राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. संबंधित सर्व विभागांना या कोट्याशी निगडित प्रक्रिया, योजना व प्रशासकीय कार्यवाही तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

