RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात? नवीन बदल व कागदपत्रे?

शिक्षण हक्क कायद्याच्याअंतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी राबवण्यात येणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून (दि.17) फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. त्यानुसार पालकांना मुलांचे अर्ज 10 मार्चपर्यंत भरता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 9 जानेवारीला शाळानोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली होती व मुदतवाढीसह संबंधित प्रक्रिया 30 जानेवारीला बंद करण्यात आली. आता प्रवेशासाठी 8 हजार 650 शाळांची नोंद झालेली आहे. एक लाख 12 हजार 706 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुण्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यात 905 शाळांची नोंद झालेली आहे. 17 हजार 509 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

महत्त्वाच्या सूचना-

  • आरटीई पोर्टलवर निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा दिसतील.
  • एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
  • पालकांना दहा शाळांची निवड करावी लागणार आहे.
  • पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे.
  • चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्यास आरटीई प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होणार आहे.
  • अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानाचे ठिकाण अचूक नमूद करावे.

यंदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार-

आरटीई प्रवेशसाठी अनेक पालकांकडून कागदपत्रांमध्ये अफरातफरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाल्यामुळे यंदा शिक्षण विभागाने अर्ज भरतानाच कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

ही कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक-

  • आई किंवा वडिलांचे आधार कार्ड
  • बालकांचे जन्मप्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा
  • भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत बाबतीत दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत गरजेची (सर्व घटकांना बंधनकारक)
  • सामाजिक वंचित घटक (पालकांचा/बालकांचा जातीचा दाखला अपंगत्वाचे प्रमाणपत्र गरजेचे) परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
  • आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला रुपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन 2023-24 किंवा 2024-25 या वर्षातील उत्पन्नचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *