केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असलेली ‘सुकन्या समृद्धी योजने’ला यशस्वी 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 22 जानेवारी 2015 रोजी सुरू झालेली ही योजना आजही मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी बचतीचा सर्वात सुरक्षित व फायदेशीर पर्याय मानला जात आहे. अत्यल्प गुंतवणूक व सरकारी हमी यामुळे मध्यमवर्गीय पालकांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय झालेली आहे.
व्याजदराच्या बाबतीत सर्व योजनांमध्ये ‘अव्वल’-
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सध्या 8.2% दराने वार्षिक व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे पीपीएफ किंवा इतर अल्पबचत योजनांच्या तुलनेमध्ये या योजनेचा व्याजदर सर्वाधिक आहे. सरकार दर तिमाहीला या व्याजाचा आढावा घेते व वर्षाच्या शेवटी हे व्याज खात्यात जमा करण्यात येते.
टॅक्समध्ये ‘ट्रिपल’ फायदा-
- गुंतवणुकीवर सवलतः कलम 80-सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तीकरात सवलत मिळते. ( जुन्या कर प्रणालीनुसार)
- व्याजावर सूटः दरवर्षी मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते.
- मॅच्युरिटीवर कर नाहीः दरवर्षी 21 वर्षानंतर मिळणारी संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री असते.
15 वर्षांची गुंतवणूक व 72 लाखांचा फंडा-
जर एखाद्या पालकाने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेच हे खाते उघडले असेल तर दरवर्षी कमाल मर्यादा म्हणजे 1.5 लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम थक्क करणारी आहे.
- वार्षिक गुंतवणूकः 1,50,000 लाख रुपये (दरमहा 12,500 रुपये)
- गुंतवणुकीचा कालावधीः 15 वर्षे मॅच्युरिटी
- कालावधीः 21 वर्षे
- सध्याचा व्याजदरः 8.2%
- तुमची एकूण गुंतवणूक: 22,50,000 रुपये
- मिळणारे एकूण व्याज: 49,32,119 रुपये
- एकूण मॅच्युरिटी रक्कमः 71, 82,119 रुपये
योजनेच्या महत्त्वाच्या अटी-
मुलीच्या जन्मापासून ते ती 10 वर्षांची होईपर्यंत हे खाते उघडता येते. वर्षाला किमान 250 रुपये भरूनही खाते सुरू ठेवता येते. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. पैसे 15 वर्ष जमा करायचे आहेत. पण खाते 21 वर्षांनी मॅच्युअर होते. मुलीच्या 18 व्या वर्षानंतर शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याची सोय आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

