केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर? काय महाग? काय स्वस्त?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत नववा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. खास करून मध्यम वर्गाचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते. त्यातल्या त्यात सर्वसामान्यांचा आवडता विषय म्हणजे काय स्वस्त झाले व काय महाग झाले. शिवाय इन्कम टॅक्सकडे नोकरदारांचे लक्ष लागून राहिले होते. सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना वस्तूवरचे कर कमी केलेले आहेत. त्यामुळे त्या आपोआप स्वस्त होणार आहेत. तर काहींवरचे कर वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या वस्तू महाग होणार आहेत. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या?-

निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार बीडी, बूट, कपड्यांची निर्यात स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर CNG ही स्वस्त होणार आहे. जर यापुढे तुम्हाला परदेशामध्ये जायचे असेल तर त्यावरील टॅक्स ही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे परदेशाचा प्रवासी स्वस्त होणार आहे. चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. त्यांच्या निर्यातीवरील कर कमी करण्यात येणार आहे. शिवाय बायोगॅस, मायक्रोवेव्ह, ओवन हे देखील स्वस्त होणार आहेत. मोबाईलच्या किमतीही कमी होणार आहेत. विशेष म्हणजे विमानाचे पार्ट स्वस्त होणार आहेत. याशिवाय बॅटरी स्वस्त होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सात गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होणार आहेत. डायबिटीजची औषधे ही कमी दरात यापुढे मिळणार आहेत. परदेशी शिक्षण देखील स्वस्त होणार आहे.

कोणत्या वस्तू महाग होणार?-

दारूवरचा टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात दारूचे दर वाढणार आहेत. शिवाय सिगारेटवरती ही कर लावण्यात येणार आहे. त्यामुळे आपोआपच सिगारेटच्या दरात ही वाढ होणार आहे. खनिजे व भंगार ही महाग होणार आहे. या अर्थसंकल्पातील सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी मधील कपात त्याचबरोबर दिलेल्या काही सवलतींमुळे या वस्तू व सेवांच्या किंमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.

स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी-

  • वैद्यकीय उपकरणे
  • लिथियम आयन बॅटरी
  • सौर पॅनल 
  • एलसीडी, एलईडी
  • भारतात बनवलेले कपडे
  • कॅन्सरची औषध
  • मधुमेहाची औषध
  • क्रीडा साहित्य
  • मोबाईल फोन
  • ईव्ही बॅटरी
  • ईव्ही वाहने
  • मोटार सायकल
  • फ्रोझन मासे
  • ईव्ही लिथियम बॅटरी
  • परदेशात शिक्षण घेणे स्वस्त
  • सीएनजी
  • बायोगॅस
  • सोलर संबंधित वस्तू
  • सौर पॅनल
  • क्रीडा साहित्य
  • बूट
  • मोटारसायकल
  • फ्रोजन मासे
  • अपघात विमा
  • मोटर सायकल

महाग झालेल्या वस्तूंची यादी-

  • पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
  • इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले तंबाखू
  • फिल्टर खैनी
  • जर्दा (सुगंधी तंबाखू)
  • गुटखा
  • दारू
  • भंगार
  • ऑप्शन ट्रेडिंग
  • खनिज

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *