आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांनसाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. शिधापत्रिकाधारकांना दिनांक 5 फेब्रुवारीपासून धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आवश्यक तेवढा धान्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे वितरणासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनकार्डधारकांना वेळेत साखर, तांदूळ व गहू मिळावे यासाठी प्रशासनाने हे नियोजन केलेले आहे.
ई-पॉस मशीनद्वारे माहिती अद्यावत झाल्यानंतरच फेब्रुवारीचे धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे, यामुळे वितरण प्रक्रियेत पारद रक्षकता येणार आहे पारदर्शकता राहणार आहे. मशीन अपडेटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरातील बहुतेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पोहोचलेले आहे. अद्यावत प्रक्रिया पूर्ण होतच लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. धान्यवाटप सुरळीत पार पडावी यासाठी पुरवठा विभागाकडून सतत देखरेख ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे. शिधापत्रिकाधारकांना 5 फेब्रुवारीपासून धान्य वाटपात गहू, तांदूळ व साखर मिळणार आहे.
ज्वारीचे वाटप केले बंद-
- कोणत्याही तक्रारीसाठी संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
- नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात धान्य वितरणास विलंब झाला होता.
- या अगोदर सर्वसाधारण रेशनकार्डधारकांना ज्वारी, गहू व तांदूळ देण्यात येत होते.
- परंतु जानेवारीपासून धान्य वाटपात बदल होत आहे व ज्वारीचे वाटप बंद करण्यात आलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

