आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता हे प्रकरण पेटलेले आहे. याबाबत आदिती ताई तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. चला तर मग सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ही अपडेट नक्की आहे तरी कोणती?
राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणामुळे ई- केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत, अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेवकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ज्यांनी ई-केवायसी केलेले नव्हते त्यांना 31 डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकला नव्हता. यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिलेल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक्ष पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आदिती तटकरे ताई नेमक्या काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाः महत्त्वाची सूचना! महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणामुळे ई- केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
महत्वाची सूचना-
- योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती.
- काही कारणामुळे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे.
- क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

