शासनामार्फत रब्बी हंगामातील पिकांची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पिकांची ऑनलाईन नोंद पूर्ण करणे गरजेचे आहे. मुदतीत नोंदणी न केल्यास सातबाऱ्यावरील पिकाचा रकाना कोरा राहणार आहे. त्यामुळे भविष्यात पीक विमा त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणी 4.0.5 हे नवीन मोबाईल ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन, शेताच्या बांधावरूनच या ॲपच्या माध्यमातून पिकाची माहिती अपलोड करायची आहे. यामुळे सातबाऱ्यावर अचूक नोंद होणार आहे व प्रक्रियेत पारदर्शकता येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.
शासनाकडून मदतीचा हात-
ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा ॲप वापरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तलाठी, कोतवाल किंवा गावात नियुक्त केलेले मदतनीस यांच्यामार्फत शेतकरी पिकांची नोंदणी करून घेऊ शकतात.
नोंदणी का गरजेची-
अववेळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदत मिळवण्यासाठी पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. नोंदणी न केल्यास सातबारा कोरा राहतो व लाभ घेताना अडचण निर्माण होते.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

