नागरिकांसाठी आधार कार्ड हे आजच्या युगातील अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँक खाते, सरकारी योजना, शाळा- कॉलेज प्रवेश, मोबाईल सिम, पॅन कार्ड लिंक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे असते. परंतु अनेक वेळा घर बदलल्यामुळे किंवा स्थलांतरामुळे आधार वरील पत्ता चुकीचा राहतो. अशावेळी आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म हा एक अधिकृत व सोपा मार्ग आहे. विशेष म्हणजे काही परिस्थितीमध्ये कोणतेही पारंपारिक Address Proof नसतानाही या फॉर्मच्या मदतीने पत्ता अपडेट करता येतो.
चला तर मग आपण सदर लेखातून जाणून घेऊया आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म म्हणजे काय?, तो कधी व कसा वापरायचा?, कोण सर्टिफाय करू शकतो?, याबद्दलची सविस्तर प्रक्रिया जाणून घेऊया. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. UIDAI कडून जारी करण्यात आलेला Certificate For Aadhar Enrollment/ Update (To be used only as proof of Address) हा अधिकृत फॉर्म म्हणजेच आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म. हा फॉर्म मुख्यत: त्या नागरिकांसाठी आहे:
- ज्यांच्याकडे लाईट बिल, पाणी बिल, रेशन कार्ड, भाडेकरार असे डॉक्युमेंट नाहीत.
- जे भाड्याच्या घरात राहत आहेत.
- स्थलांतरित कामगार
- नवविवाहित महिला
- ग्रामीण भागातील नागरिक
आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म कधी उपयोगी पडतो?-
- घर बदलल्यानंतर नवीन पत्त्याचे डॉक्युमेंट नसतील तर
- भाडेकरार नोंदणीकृत नसेल तर
- पालकांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी राहत असाल तर
- ग्रामीण भागात अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसतील तर
- तात्पुरता पत्ता आधार वर अपडेट करायचा असेल तर
कोण सर्टिफाय करू शकतो?-
आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्मवरती कोणत्याही व्यक्तीची साईन करता येत नाही. UIDAI ने ठरवून दिलेल्या अधिकृत व्यक्तीच सर्टिफाय करू शकतात.
मान्य सर्टिफायरः
- Gazetted Officer (Group A/Group B)
- तहसीलदार
- खासदार(MP)/आमदार(MLA)/नगरसेवक
- EPFO अधिकारी
- मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमुख (विद्यार्थ्यांसाठी)
- ग्रामपंचायत सरपंच/सचिव/ग्राम महसूल अधिकारी (ग्रामीण भागात)
आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म कसा भरावा?-
- सर्वात अगोदर UIDAI चा आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म येथे क्लिक करून डाऊनलोड करावा व तो A4 साईजमध्ये कलर प्रिंट करावा.
- सर्व माहिती कॅपिटल LETTER मध्ये भरावी.
- पूर्ण नाव, नवीन पत्ता अचूक भरावा.
- फोटो चिकटवा(Passport Size).
- सर्टिफायर कडून फोटोवर Cross Sign व Cross Stamp करून घ्यावा.
- सर्टिफायरची सही, शिक्का, पदनाम व संपर्क क्रमांक गरजेचा ओह.
- ओव्हररायटिंग टाळा.
आधार कार्ड पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर भरलेला आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये द्या.
- आधार नंबर व बायोमेट्रिक पडताळणी होईल.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर पावती मिळेल.
- साधारण 7 ते 30 दिवसात पत्ता अपडेट होतो.
- आधार कार्ड पत्ता अपडेट फॉर्म हा फक्त ऑफलाईन पद्धतीसाठीच वैद्य आहे. UIDAI च्या MyAadhaarPortal वर हा फॉर्म अपलोड करून पत्ता अपडेट करता येत नाही.
- ह्या फॉर्मची वैधता फॉर्म जारी केल्यापासून तीन महिन्यापर्यंतच आहे. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर नवीन फॉर्म घ्यावा लागतो.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

