आता लवकरच RTE अॅडमिशन 2026-27 सुरू होणार आहे. RTE अॅडमिशन म्हणजे राईट टू एज्युकेशन. यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी पहिली इत्यादी वर्गामध्ये कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश देण्यात येतो. यासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. यामध्ये लॉटरी लागत असते व त्या लॉटरी मधून प्रवेश निश्चित केला जातो. काही दिवसांमध्येच याची अॅडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.
RTE प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे-
टीप-1) आर.टी.ई 25% ऑनलाईन प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता गरजेची आहेत.
- वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो-
- जात संवर्गातील- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), इतर मागास(ओ.बी.सी), विशेष मागास बालके(एस.बी.सी) या प्रवर्गातील असल्याचे जात प्रमाणपत्र
- दिव्यांग बालके
- एच.आई.व्ही बाधित किंवा एच.आई.व्ही प्रभावित बालके
- कोव्हीड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन)
- अनाथ बालके
- अ) वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे)-
उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र. पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला गरजेचा. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा-
जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% व त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- एच.आय.व्ही बाधित/प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे-
जिल्हा शैल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
- अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे-
वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यूप्रमाणपत्र
ब) कोविड 19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
सदर मृत्यू कोव्हीड 19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाण हे शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.
- ब) अनाथ बालके (वंचित घटक)-
आवश्यक कागदपत्रे-
- अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.
- जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा संभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे.
- अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदारणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास-
वर्षे उत्पन्नाचा दाखला-
तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, Salary स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष 2023- 24 किंवा 2024-25 मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे-
- न्यायालयाचा निर्णय
- घटस्फोटीत महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
- बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला
- न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला-
- घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा
- घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
- बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला
- विधवा महिला –
- पतीचे मृत्युपत्र (प्रमाणपत्र)
- विधवा महिलेचा/बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा
- बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
- आधार कार्ड-
वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक-
आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी/पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे बालक/ पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये बालकाचे/पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याचा दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसे शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास आर.टी.ई 25 टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.
- जन्मतारखेचा पुरावा-
वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक-
ग्रामपंचायत/न.पा./म.न.पा. यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई-वडील अथवा पालकांनी प्रतीज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
- रहिवासाचा/ वास्तव्याचा पुरावा-
वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक-
रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना) वीज/टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक/ घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

