ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ‘या’ 11 सेवा ऑनलाईन उपलब्ध!

शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केलेली आहे. या अंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वारस नोंद, ई-करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना या अगोदर काही कामासाठी तलाठी कार्यालयातच जावे लागत असे. परंतु आता ती गरज भासणार नाही. ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

महा-ई-सेवा केंद्रावर नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात. सात-बारा उताऱ्यावरील अडचणी, फेरफार नोंदीचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना युनिक फॉर्मर आयडी देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्ज किंवा इतर कामांसाठी इतर उतारे देण्याची गरज आता भासणार नाही.

ई-हक्कद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा-

  • जमीन खरेदी-विक्री(Sale-Purchase Mutation)
  • वारसाहक्क नोंदणी(Inheritance Mutation)
  • कौटुंबिक वाटणी(Partition Mutation)
  • न्यायालयीन आदेशावर आधारित नोंदी
  • बोजा कमी करणे
  • एकत्र कुटुंब नोंद कमी करणे
  • अपाक शेरा कमी करणे
  • इ.करार नोंद
  • विश्वस्ताचे नाव कमी करणे
  • बोजा चढविणे/गहाणखत
  • संपत्तीचे हस्तांतरण(Transfer Of Rights)
  • मृताचे नाव कमी करणे

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *