आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा आज पासून म्हणजेच 13 जानेवारी 2026 पासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. हा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तसेच भरपूर बहिणी म्हणत आहेत की आम्हाला 3000 रुपये मिळतील की 1500 रुपये? नक्की किती पैसे मिळणार आहेत? तर फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
अनेक न्यूज चॅनेल खोट्या बातम्या देत आहेत. त्यामुळे कोणत्याही खोट्या बातमीवरती विश्वास ठेवू नका. फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत. 3000 किंवा 6000 रुपये मिळणार नाहीत. असा स्पष्ट उल्लेख निवडणूक आयोगाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आज, उद्या व परवापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा. तसेच अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

