स्वस्त धान्य दुकानांमध्ये 1 जानेवारीपासून धान्य वितरणात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये गव्हाचा कोटा वाढवण्यात आलेला आहे, तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे. याशिवाय स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय ग्राहकांना साखरेचे वितरण केले जाणार आहे. यामुळे अंत्योदय ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. तर इतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुरवठा विभागाला धान्य वितरणामध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य मिळविताना नवे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. ग्राहकांकडून गहू व तांदळाचा कोटा वाढवण्यात यावा अशी मागणी केली जात होती. प्रत्यक्षात यात गव्हाचा कोटा वाढवण्यात आला आहे तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे.
अंत्योदय कार्ड धारकांच्या कोट्यामधील बदल-
अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कार्ड 35 किलो धान्य देण्यात येते. पूर्वी स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय कार्ड धारकांना 15 किलो तांदूळ व 20 किलो गहू दिले जात होते. आता नवीन बदलानुसार या कुटुंबांना 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ दिले जाणार आहे.
प्राधान्य गटाच्या धान्यातही बदल-
या कार्डधारकांना पूर्वी 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ दिले जात असे. आता 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मिळणार आहे. म्हणजेच एका किलोने तांदळाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे. तर गव्हाचा कोटा वाढवण्यात आलेला आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

