लाडकी बहीण योजनेची eKYC वडील/पती नसल्यास नवीन पद्धतीने कशी करावी?

आज आपण ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही, घटस्फोटीत आहेत; त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. त्या लाडक्या बहिणी सुद्धा आता आपली e-KYC सबमिट करू शकतात. विशेषतः ज्या महिला अविवाहित आहेत, विधवा आहेत, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, घटस्फोटीत आहेत, अशा सर्व बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे.

परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सुधारणा करण्याची संधी फक्त एकदाच उपलब्ध आहे व 31 डिसेंबर 2025 पर्यंत हा पर्याय उपलब्ध राहणार आहे. e-KYC कशी करायवी? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. परंतु त्या अगोदर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

e-KYC ची प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
  • तेथे एक नोटीस देण्यात आलेली आहे, ती व्यवस्थित वाचून ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • सर्वप्रथम वरती तीन डॉट दिसत आहेत, त्यावरती क्लिक करून ‘Desktop site’ हा पर्याय निवडायचा आहे. हे केल्यानंतरच व्यवस्थित eKYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
  • आता पुढे लाभार्थी आधार क्रमांक व कॅप्च्या भरून आधार प्रमाणिकरणासाठी संमती द्यावी व OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करावे.
  • आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP टाकून सबमिट करा.
  • आता पुढे विचारण्यात आले आहे, की विवाहित आहात की अविवाहित. जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करा. अविवाहित असाल तर अविवाहित सिलेक्ट करा.
  • जर विवाहित असाल तर पुढे देण्यात आलेल्या पर्यायातील पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटीत आहे यापैकी लागू असलेल्या पर्यावरती क्लिक करावे.
  • अविवाहित असाल तर पुढे देण्यात आलेल्या पर्यायातील वडिलांचे निधन झाले आहे हा पर्याय निवडा.
  • तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मृत पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरण्याची गरज भासणार नाही.
  • आता पुढे जात प्रवर्ग निवडायचा आहे व खाली जे दोन प्रश्न दिले आहेत त्यासाठी ‘नाही’ हा पर्याय काळजीपूर्वक निवडा.त्याचबरोबर खाली दोन बॉक्सवरती टिक करून ‘सबमिट करा’ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • खाली देण्यात आलेल्या नोट नुसार, या महिलांना पतीचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार आहेत‌.
  • आता तुमच्यापुढे ‘तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *