आज आपण सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेची e-KYC करत असताना ज्या काही चुका झाल्या होत्या त्या आता दुरुस्त करता येणार आहेत. त्यासाठी नवीन पर्याय देण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही, घटस्फोटीत आहेत; त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्या लाडक्या बहिणी सुद्धा आता आपली e-KYC सबमिट करू शकतात. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना e-KYC पुन्हा करायची असेल तर त्या सुद्धा परत करू शकतात.
e-KYC करताना जी माहिती भरलेली आहे, ती परत चेक करायची असेल तरीसुद्धा e-KYC परत करता येणार आहे. विशेषतः ज्या महिला अविवाहित आहेत, विधवा आहेत, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, घटस्फोटीत आहेत अशा सर्व बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सुधारणा करण्याची संधी फक्त एकदाच उपलब्ध आहे व 31 डिसेंबर 2025 पर्यंत हा पर्याय उपलब्ध राहणार आहे. e-KYC कशी करायची चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. परंतु त्या अगोदर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
e-KYC दुरुस्तीची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- तेथे एक नोटीस देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित वाचून ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- आता पुढे लाभार्थी आधार क्रमांक व कॅप्च्या भरून आधार प्रमाणिकरणासाठी संमती द्यावी व OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करावे.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP टाकून सबमिट करा.
विविध परिस्थितीनुसार e-KYC प्रक्रिया व गरजेची कागदपत्रे-
विवाहित महिला
पती हयात असल्यास:
- पतीचा आधार क्रमांक टाकावा. कॅप्च्या टाकून ‘मी सहमत आहे’ यावरती क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आलेला OTP टाकून सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता पुढे जात प्रवर्ग निवडायचा आहे व खाली दोन पर्याय देण्यात आलेले आहेत त्यातील पहिला म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे.
- दुसरा पर्याय म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे व खालील दिलेल्या बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यापुढे ‘तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.
पतीचे निधन झालेले असल्यास किंवा घटस्फोट झालेला असल्यास:
- आता पुढे जात प्रवर्ग निवडायचा आहे व खाली दोन पर्याय देण्यात आलेले आहेत त्यातील पहिला म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे.
- दुसरा पर्याय म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे व खालील दिलेल्या दोन्ही बॉक्समध्ये टिक करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- खाली देण्यात आलेल्या नोट नुसार, या महिलांना पतीचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी लागणार आहेत
- आता तुमच्यापुढे ‘तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.
अविवाहित महिला
वडील हयात असल्यास:
वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्यांच्या OTP द्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.
वडिलांचे निधन झालेले असल्यास:
- आता पुढे जात प्रवर्ग निवडायचा आहे व खाली दोन पर्याय देण्यात आलेले आहेत त्यातील पहिला म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे.
- दुसरा पर्याय म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत ‘नाही’ यावरती क्लिक करायचे आहे व खालील दिलेल्या दोन्ही बॉक्समध्ये टिक करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- खाली देण्यात आलेल्या नोटनुसार, या महिलांना वडिलांचा मृत्यूचा दाखला 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी लागणार आहे.
- आता तुमच्यापुढे ‘तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा मेसेज येईल.

