31 डिसेंबर पर्यंत ही तीन कामे करून घ्यायची आहेत, जर तुम्ही ही तीन कामे नाही केली तर तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया नक्की ही तीन कामे आहेत तरी कोणती? परंतु त्या अगोदर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
काम क्रमांक 1: वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवा
सर्वात पहिले व महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून घ्यावी. राज्य शासनाने या नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिलेली आहे. 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. जर तुमच्या गाडीला 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेली नंबर प्लेट असेल व जुनीच नंबर प्लेट वापरत राहिल्यास, तुम्हाला परिवहन विभागाकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे दंडाची कारवाई टाळण्यासाठी व वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे काम 31 डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
काम क्रमांक 2: लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा
तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. केवायसी नाही केली तर या योजनेअंतर्गत मिळणारा 1500 रुपयांचा मासिक हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. ही आर्थिक मदत सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी या मुदतीपर्यंत त्वरित त्यांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
काम क्रमांक 3: आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा
तिसरे व सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. हे काम प्रत्येकाला करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जसे की तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते किंवा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला रुपये 1000 चा दंड भरावा लागण्याचे शक्यता आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळी ठेवण्यासाठी व दंड टाळण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
नागरिकांना आवाहान-
वरील तिन्ही कामांसाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. नागरिकांनी ही मुदत अंतिम मानून कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता दंड टाळण्यासाठी व सरकारी योजनांचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ही महत्त्वाची तीन कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत.

