आज आपण सदर लेखातून आज आपण राज्यातील रेशनकार्ड धारकासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होणार आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानातून प्रतिमहा एक किलो साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा अत्यंत गरीब व गरजू कुटुंबांना होणार आहे.
साखर वाटप बंद होण्याचे कारण काय?-
मागील दीड वर्षापासून साखरेच्या टेंडर प्रक्रियेअभावी रेशन दुकानांमधून साखर वितरण पूर्णपणे बंद झाले होते. साखरेसाठी बाजारात 44 रुपये प्रति किलो द्यावे लागतात, परंतु रेशन दुकानामध्ये 20 रुपये प्रतिकिलो दराने साखर देण्यात येते.
निर्णय काय?-
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर व डिसेंबर 2025 त्याचबरोबर जानेवारी 2026 या तीन महिन्यांसाठी साखरेचे नियतन शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. बहुतांश सामान्य कुटुंबामध्ये सण उत्सवामध्ये गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्डला एक किलो याप्रमाणे साखर देण्यात येते. मागील दीड वर्षापासून रेशन दुकानात साखर मिळत नव्हती. सध्या जिल्हा पुरवठा विभागाला एक महिन्याचे नियतन प्राप्त झालेले आहे.
शासनस्तरावर साखरेचे टेंडर होत नसल्याने रेशन दुकानातून पुरवठा बंद झाला होता. याचा फटका 87 हजार 064 अंत्योदय कार्डधारकांना बसला होता. लाभार्थ्यांना साखर उपलब्ध करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियतन पाठवले होते. यापैकी या महिन्यासाठी पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झालेले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामामध्ये साखर उपलब्ध झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये रेशन दुकानातून साखरेचे वाटप सुरू होणार आहे. यामुळे यंदा सामान्य कुटुंबातील नागरिकांना नववर्षाअगोदरच गोडवा मिळाला आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

