नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. भरपूर दिवस झाले तरी काहीही अपडेट किंवा जीआर येत नव्हता. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जीआर आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे? व तो कोणा कोणाला मिळणार आहे? याबद्दलची माहिती.
GR मधील महत्त्वाचा मुद्दा-
वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.07.04.2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर, 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षकाखाली 31- सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रु.263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
याचा अर्थ असा आहे की, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनीची ई-केवायसी प्रक्रिया झालेली आहे किंवा झालेली नाही त्यांना सुद्धा हा हप्ता दिला जाणार आहे. फक्त हे लक्षात असू द्या ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर आहे. त्या अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

