भारताच्या कांदा आयातीस बांगलादेशने दिली परवानगी?

तब्बल दहा महिन्यापासून भारतीय कांद्याच्या आयातीस परवानगी नाकारलेल्या बांगलादेशने त्यांच्या देशातील कांद्याचा स्टॉक संपताच भारतातील कांद्याच्या आयातीस परवानगी दिलेली आहे. शुक्रवारी (दि.5) रोजी तेथील शासनाने याबाबतचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आता भारतातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दररोज 1500 मेट्रिक टन कांदा बांगलादेशला रवाना होणार आहे. 7 डिसेंबर पासून प्रत्येक दिवशी 30 टनांचे 50 (आयपी) म्हणजे कांदा आयात परवाने दिले जाणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यांनाच हे आयपी परमिट दिले जाणार आहे.

बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे. या देशाने दहा महिन्यापासून परवानगी नाकारल्याने कांदा चाळीतच साठून राहिला होता. बांगलादेशने भारताच्या कांद्याला परवानगी दिल्याने आपल्याकडील साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला व नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळेल. बाजारातील परिस्थितीनुसार ही नियंत्रित आयात प्रक्रिया पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहील, असे निर्यातदार संघटनेचे विकास सिंग यांनी म्हटले आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *