पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक असणारी परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यासाठी सोमवारी (दि.8) रोजी शेतकरी व जिल्हा प्रशासन यांची बैठक पार पडणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या भूसंपादनाची आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
भूसंपादनाच्या बदल्यात घेण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल 19 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. हा अहवाल राज्य शासनाने मान्य करून तो उद्योग विभागाकडे पाठवलेला होता. या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32 (1) कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे गरजेचे असते. आठ दिवसांपूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी चर्चा केलेली होती.
जिल्हा प्रशासनने दिलेल्या 32 (1) चा प्रस्ताव उद्योग विभागाकडून मान्य करण्यात आलेला आहे. ही मान्यता मिळाल्याने आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी वाटघाटी करण्यास जिल्हा प्रशासनाला मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत डुडी म्हणाले, भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर येत्या सोमवारी बैठक बोलवण्यात आलेली आहे. चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहे. दराबाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे-
- पुरंदर तालुक्यातील सात गावातील 1 हजार 285 हेक्टर अर्थात तीन हजार एकर जमिनीचे संपादन केले जात आहे.
- त्यासाठी आतापर्यंत सुमारे सव्वा बाराशे हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी या अगोदर संमती दिलेली आहे.
- सुमारे 50 हेक्टर क्षेत्र अजूनही संमतीविना आहे. तर नकाशाच्या बाहेरील सुमारे 240 हेक्टर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांनी मान्यता दिलेली आहे.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32 ( 3 ) तरतुदीनुसार शेतकऱ्यांचा मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होणार आहे.
- यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

