नवीन शेतजमीन रस्ता किंवा अगोदर असलेला रस्ता मोकळा करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

शेतासाठी नवीन रस्ता मिळवण्याची पहिली तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांनुसार तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचा शेतरस्ता मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नवीन रस्ता हवा असल्यास अर्ज सादर करून खालील कागदपत्रे जोडावीत

  • अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ज्या शेतीसाठी रस्ता हवा आहे त्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर व हद्दीतील तपशील, रस्ता कोणत्या जागेवरून हवा आहे त्याची सविस्तर माहिती, अर्जदाराच्या शेतजमनीचा व त्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी ज्या लगतच्या शेतजमिनीच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केलेली आहे, त्याचा कच्चा नकाशा.
  • अर्जदाराच्या शेतजमिनीचा भूमी अभिलेखाकडील शासकीय मोजणी नकाशा.
  • अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा उतारा.
  • रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक लगतच्या सर्व शेतकऱ्यांची संमती पत्रे व पत्ते.
  • अशा जमिनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची माहिती कागदपत्रांसह कार्यालयात द्यावी.
  • शेतीजमिनीशी संबंधित इतर अन्य कागदपत्रे.

उपलब्ध रस्ता मोकळा करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे जोडावीत

  • दावेदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील (३ महिन्याच्या आतील) सातबारा उतारा व मोजणी नकाशा.
  • रस्ता मोकळा करण्यासाठी आवश्यक लगतच्या सर्व (रस्त्या अडवलेल्या) शेतकऱ्यांची नावे व पत्ते
  • निर्माण झालेल्या अडथळ्याचे फोटो, कच्चा नकाशा.
  • दाव्यास कारण निर्माण होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला नाही हे सिद्ध करणारी काही कागदपत्रे किंवा फोटो.

अशा जमिनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर न्यायालयाने जर स्थगिती आदेश (Stay Order) किंवा जैसे थे (Status quo) आदेश दिला असेल तर त्याची माहिती कागदपत्रांसह सादर करावी.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *