आधारकार्ड डाऊनलोड करा OTP शिवाय?

तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असेल. परंतु तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला नाही किंवा OTP येण्याची वाट वारंवार पाहून कंटाळा आलेला असेल? तर काळजी करू नका! UIDAI ने आता एक अत्यंत सोपी व सुरक्षित नवीन पद्धत आणलेली आहे. ती म्हणजे फेस ऑथेंटीकेशन. याचा वापर करून आधार डाऊनलोड करू शकता. या नवीन प्रक्रियेमुळे तुम्हाला कोणत्याही ओटीपीची गरज भासणार नाही व मोबाईल नंबर लिंक नसतानाही तुम्ही तुमचे ई-आधार काही मिनिटांमध्ये थेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू शकता.

आधार डाऊनलोड करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर Play Store/ios वर जाऊन “Aadhaar App (UIDAI)” डाऊनलोड करावे. त्यानंतर हे ॲप ओपन केल्यावरती Skip Introduction And Register या पर्यायावर क्लिक करावे. त्याचबरोबर I’m ready with my Aadhaar या पर्यायावरती क्लिक करावे.
  • त्यानंतर पुढे ज्या व्यक्तीचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे व Continue या पर्यायावर क्लिक करावे.
  • यानंतर अटी व शर्ती मान्य करून Proceed या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपले Sim सिलेक्ट करायचे आहे व Send SMS वर क्लिक केल्यानंतर पुढे Continue To Face Authentication या पर्यावरणातील करावे.

चष्मा घातला असेल तर काढा.

चेहरा गोल फ्रेममध्ये ठेवा.

डोळे उघडणे/मिचकावणे यासारखे सूचनांचे पालन करा.

  • यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्याचा फेस येथे घ्यायचा आहे, त्यासाठी Initiate Face Authentication या पर्यावरण क्लिक करायचे आहे व आपले Face Authentication करायचे आहे व त्यानंतर Proceed या पर्यावरती क्लिक करायचे आहे.
  • ॲप लॉगिनसाठी एक सुरक्षित सहा अंकी PIN सेट करावा व Confirm करावे.
  • यानंतर वरती Skip Guide हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
  • आता ॲपमध्ये तुमचा बारकोड दिसेल. त्यावर क्लिक करावे. खाली स्क्रोल करून share ID वरती क्लिक करावे व त्यातील डाऊनलोड आधार हा पर्याय निवडावा.
  • Continue केल्यावरती तुमचे ई-आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे.

PDF फाईलला उघडण्यासाठी पासवर्ड कसा टाकावा: 

डाऊनलोड केलेल्या आधार कार्डची पीडीएफ फाईल पासवर्ड सुरक्षित असते. ती उघडण्यासाठी खालील सूत्रांचा वापर करावा. 

  • त्यामध्ये तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर इंग्रजीमध्ये कॅपिटल अक्षरात व जन्मतारखेचे फक्त वर्ष टाकावे. 
  • आता Open या पर्यायावरती क्लिक करावे. या सोप्या व सुरक्षित पद्धतीने तुम्ही कोणाचेही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

 नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *