आता रेशनकार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू?

आता रेशन कार्डधारकांच्या मोबाईलवरती थेट धान्याचा हिशोब एसएमएसद्वारे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाईलद्वारे पाठवली जात आहे. या सुविधेची नुकतीच सुरुवात झालेली आहे. पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधित अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आलेले आहेत. या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे.

त्यामध्ये ज्वारी, गहू व तांदूळ या धान्य प्रकारांचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळणार आहे, हे देण्यात आलेले आहे. या आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून भारत सरकारच्या पूर्णपणे नि:शुल्क दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800224950 व 1967 उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. या सोयीमुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे.

‘मेरा रेशन’ ॲप उपयुक्त-

जर काही कारणास्तव एसएमएस प्राप्त झाला नाही, तर ‘मेरा रेशन’ या ॲपवरती आधार क्रमांक टाकून धान्याचा कोटा तपासता येतो. मंजूर धान्य व प्रत्यक्ष दिलेल्या धान्यामधील फरक ओळखण्यास हे अ‍ॅप उपयुक्त पडत आहे.

मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य-

  • मोबाईल एसएमएस मिळवण्यासाठी रेशन कार्डशी मोबाईल नंबर जोडणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर येणाऱ्या महिन्यात किती व कोणते धान्य मिळणार आहे, याची माहिती मिळेल.
  • परंतु काही ठिकाणी चुकीचे एसएमएस येण्याच्या तक्रारी आल्याने पुरवठा विभागाने याबाबत तपास सुरू केलेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *