बांधकाम कामगारांचे जीवन हे असुरक्षित व अनिश्चिततेने अनेकदा भरलेले असते. यामुळे त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्याद्वारे अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे “अत्यावश्यक वस्तूंचा संच योजना”. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरातील आवश्यक वस्तूंचा एक मोफत संच देण्यात येतो. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत राबवली जाते.
या योजनेचा मुख्य हेतू बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मूलभूत गरजांच्या वस्तू उपलब्ध करून देणे हा आहे. अनेक कामगारांकडे कायमस्वरूपी निवास व्यवस्था किंवा आवश्यक घरगुती साहित्य नसते. त्यामुळे शासनाने या “अत्यावश्यक संच” योजनेच्या माध्यमातून त्यांना जीवनातील किमान गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाते.
सदर योजनेची पात्रता-
- अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.
- नोंदणी वैद्य व अद्यावत असावी.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकामाचे काम केलेले असावे.
- सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली असावी.
सदर संचामध्ये काय काय वस्तू मिळणार?-
- पत्र्याची पेटी
- प्लास्टिक चटई
- धान्य साठवण्यासाठी कोठी (25 किलो क्षमता)
- धान्य साठवण्यासाठी कोठी (22 किलो क्षमता)
- बेडशीट
- चादर
- ब्लॅकेट
- साखरेचा डबा (1 किलो, SS 202)
- चहा पावडरचा डबा (500 ग्रॅम, SS 202)
- स्टील वॉटर प्युरिफायर (18 लिटर) – 2 कॅंडसह
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- नोंदणी प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा (विज बिल/रहिवासी दाखला)
- पासपोर्ट साईज फोटो
- कामाचे प्रमाणपत्र (जर गरज असेल तर)
सदर योजनेसाठीचा रजिस्ट्रेशन नंबर काढण्याची प्रक्रिया-
- सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक गरजेचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर iwbms.mahabocw.in/profile-login या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- त्यानंतर आधार नंबर व मोबाईल नंबर टाकावा व Proceed Form येथे क्लिक करावे.
- आता तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल तो टाकावा व Validate OTP करावा.
- आता पुढे तुमचे नाव व इतर माहिती दिसेल, त्यामध्ये Registration number दाखवला जाईल. तो Registration number copy करायचा आहे. तो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे.
सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- तेथे खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांक/ BOCW Registration Number टाकायचा आहे व SEND OTP वरती क्लिक करायचे आहे.
- आता OTP आल्यानंतर VERIFY OTP करायचा आहे.
- त्यानंतर बांधकाम कामगार विभागाकडे तुमची नोंदणी आहे ती सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल. तेथे सर्वात खाली आल्यानंतर Select Camp / शिबीर निवडा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे व त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जवळचा कोणताही Camp निवडायचा आहे.
- त्यानंतर APPOINTMENT DATE निवडायची आहे व अॅपॉईटमेट प्रिंट करा येथे क्लिक करायचे आहे.
- आता समोर दिसणाऱ्या पावतीची प्रिंट काढायची आहे. ही पावती व त्यासोबत आधार कार्ड घेऊन आपण जो कॅम्प निवडला आहे, त्या ठिकाणी त्या तारखेला जायचे आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
सुधारित शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.