बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

बांधकाम कामगार योजनेचा उद्देश हा ज्यांना रोज मेहनत करून जगाव लागत आहे त्या बांधकाम कामगारांना थोडी आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या घरात स्वयंपाकाची सोय व्हावी हा आहे. आता या योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. म्हणजेच पात्र कामगारांना पुन्हा अर्ज करता येणार आहे. या योजनेचा फायदा फक्त त्या लोकांना मिळणार आहे जे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यांचे नावे या मंडळात आहे व ज्यांचे कार्ड व स्मार्ट कार्ड सक्रिय आहे तेच या योजनेचा अर्ज करू शकणार आहेत.

या योजनेमध्ये सरकार एकूण 30 गृह उपयोगी भांड्यांचा संच पूर्णपणे मोफत देते. या संचामध्ये मिळणाऱ्या वस्तू जसे की ताट-4, वाट्या-8, पाण्याचा ग्लास-4, पातेले (झाकणासह)- 3, भातवाडी (भात वाढण्यासाठी)- 01, मोठा चमचा (वरण/भाजी वाढण्यासाठी)- 01, पाण्याचा जग (2 लिटर)- 01, मसाल्याचा डब्बा (7 कप्प्याचा)- 01, तीन डब्याचा सेट (14,16 व 18 इंच)- 03, परात- 01, कुकर (5 लिटर स्टील)- 01, कढई(स्टीलची)- 01, स्टीलची पाण्याची टीप- 01

सदर योजनेसाठीचा रजिस्ट्रेशन नंबर काढण्याची प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर iwbms.mahabocw.in/profile-login या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
  • त्यानंतर आधार नंबर व मोबाईल नंबर टाकावा व Proceed Form येथे क्लिक करावे.
  • आता तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल तो टाकावा व Validate OTP करावा.
  • आता पुढे तुमचे नाव व इतर माहिती दिसेल, त्यामध्ये Registration number दाखवला जाईल. तो Registration number copy करायचा आहे. तो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे.

सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
  • तेथे खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांक/ BOCW Registration Number टाकायचा आहे व SEND OTP वरती क्लिक करायचे आहे.
  • आता OTP आल्यानंतर VERIFY OTP करायचा आहे.
  • त्यानंतर बांधकाम कामगार विभागाकडे तुमची नोंदणी आहे ती सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल. तेथे सर्वात खाली आल्यानंतर Select Camp / शिबीर निवडा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे व त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जवळचा कोणताही Camp निवडायचा आहे.
  • त्यानंतर APPOINTMENT DATE निवडायची आहे व अ‍ॅपॉईटमेट प्रिंट करा येथे क्लिक करायचे आहे.
  • आता समोर दिसणाऱ्या पावतीची प्रिंट काढायची आहे. ही पावती व त्यासोबत आधार कार्ड घेऊन आपण जो कॅम्प निवडला आहे, त्या ठिकाणी त्या तारखेला जायचे आहे.
  • तेथे गेल्यानंतर अंगठ्याचा ठसा घेतला जाईल व तुम्हाला भांड्यांचा संच दिला जाईल.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *