राज्य शासनाने जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीचा गुरुवारी जीआर प्रसिद्ध केलेला आहे. या जीआर मध्ये नुकसानग्रस्त 32 पैकी 32 जिल्ह्यांची यादी आहे. परंतु धुमाकूळ घातलेल्या नांदेड जिल्ह्याचा समावेश या जीआर मध्ये नाही. त्यामुळे हे प्रशासकीय नजर चुकीने झाले असणार अशी चर्चा आहे. या पॅकेजनुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 4 लाखांची आर्थिक मदत तर अपंगत्व आले तर 74,000 ते 2.5 लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
जखमींसाठी, घर पडझड, जनावरे मृत्यू तसेच शेतीपीक, जमीन, गोठे, झोपड्या व मत्स्यव्यवसायाचे नुकसान झालेल्यासाठी विविध आर्थिक दर निश्चित करण्यात आलेले आहे. शेतीतील नुकसानीसाठी प्रति हेक्टर रु. 32,500 पर्यंत मदत मिळणार आहे व जमीन वाहून गेलेल्यांना 47,000 प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी 37,500, ओढकाम जनावरांसाठी 32,000, लहान जनावरांसाठी 20,000, शेळी/ मेंढीसाठी 4,000 रुपये व रू. 100 प्रतिकोंबडी मदत दिली जाणार आहे.
फी माफी वीज बिल माफी-
- शासनाने जमीन महसुलात सूट, कर्ज पुनर्गठन, एक वर्षाची कर्ज वसुली स्थगिती, वीज बिल माफी, परीक्षा शुल्क माफी, दहावी-बारावी विद्यार्थ्यांची फी माफी अशा विविध सवलतींची घोषणा केलेली आहे.
- शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खत व बियाणे घेण्यासाठी प्रतिहेक्टर 10,000 (3 हेक्टरपर्यंत) थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तसेच मनरेगा योजनेच्या माध्यमातून शेतजमीन पुन्हा लागवडी योग्य करण्यासाठी प्रतिहेक्टर 3 लाखापर्यंत मदत देण्यात येणार आहे.
- राज्यातील तातडीच्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 10 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे व ही कामे ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व ऊर्जा या विभागामार्फत कामे राबवली जाणार आहेत, असे या जीआरमध्ये सांगण्यात आलेले आहे.
ई-केवायसी मधून सूट-
- ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅगमध्ये नोंदणी होऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवरती भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सोयीस्कर होण्यासाठी ई-केवायसीमधून सूट देण्यात आलेली आहे, असे जीआर मध्ये सांगण्यात आलेले आहे.
- लाभार्थ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याचा संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच या याद्या गाव व तालुका पातळीवरती प्रसिद्ध करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
- सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.