“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज (10 ऑक्टोबर 2025) पासून सुरुवात झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्ह्यातील योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार सलंग्न बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ-
आता जरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार असला तरी पुढील महिन्यापासून लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे.
- सप्टेंबरसाठी शिथिलता- सध्या सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होत आहे. त्यासाठी ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनाही हा हप्ता दिला जाणार आहे.
- ई-केवायसी सुविधा- या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- ई-केवायसीची अंतिम मुदत- शासनाने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्याच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की शासनाने ई-केवायसी करण्यासाठी आणखी पुढील दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी कोणताही गोंधळ न करता लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.