महायुती शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु आता नियम व अटीमुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना पडताळणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच दिवाळी सण तोंडावरती आल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार, याकडे सगळ्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.
यासंदर्भातील GR शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया नक्की या GR मध्ये काय महत्वपूर्ण माहिती आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रु.410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की येत्या तीन ते चार दिवसांमध्ये 13 किंवा 14 ऑक्टोबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
KYC केलेली नसेल तरीही मिळणार हप्ता-
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी केलेली असेल किंवा केलेली नसेल तरी देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा सगळ्या पात्र बहिणींना मिळणार आहे. सध्या लाडकी बहिणीची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे KYC ची अट तुर्तास वगळण्यात आलेली आहे. वेबसाईट सुरळीतपणे सुरू झाल्यावरती सर्व महिलांना KYC करणे बंधनकारक असणार आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.