महाडीबीटी पोर्टलवरती सर्व शेतकऱ्यांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात. या योजना राबवत असताना काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही चूक केली तर 5 वर्ष त्या शेतकऱ्याला ब्लॉक करण्यात येणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR काढण्यात आलेला आहे. महाडीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यामधील गतीमानता टिकवून राहावी यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीच्या ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली राबवण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे.
ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते, हे आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटीवर आज पर्यंत जे अर्ज प्रलंबित आहेत, ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील. जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची त्याचबरोबर खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतील, त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येणार आहे. त्यांचा आधार व फार्मर आयडी पुढील 5 वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. ज्या घटकांकरिता लाभार्थ्यांची निवड झालेली आहे, त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्या पुढील किमान 3 वर्षे घेणे अपेक्षित आहे.
विहीत मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल. अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी हा कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील 3 वर्षे ब्लॉक करण्यात येणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील. त्याचबरोबर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहणार आहे. जी कागदपत्रे उदा. 7/12 व 8 अ, जातीचे प्रमाणपत्र, शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत, अशी कागदपत्रे ए.पी.आय. द्वारे उपलब्ध होऊ शकतात.
त्यासाठी आवश्यक सुविधा महा आय.टी., मुंबई यांच्यामार्फत पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महा डी.बी.टी. पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभासाठी पात्र अर्जास पूर्व संमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत लाभ न घेतल्यास, त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवला जाईल व तो अर्ज रद्द करण्यात येणार आहे. तसेच सदर अर्ज हा त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.