लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना येत अ‍सलेल्या error वरती आदिती तटकरे यांनी दिली, महत्त्वपूर्ण माहिती?  

मागील वर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही अपात्र महिलांनी ही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे लक्षात आल्यामुळे शासनाने लाडकी बहिणी योजनेची ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ई-केवायसी करत असताना अनेकांना एरर येत आहे.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना भरपूर बहिणींना अनेक एरर येत होते जसे की We’re experiencing high traffic. Please try again later, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, Unable to send OTP. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही, ही ओटीपीची समस्या लवकरच निकाली निघणार आहे. याप्रकरणी गंभीर दखल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतलेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे या समस्या येत आहे असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर ही समस्या लवकरच निकाली निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही पोस्ट त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलेली आहे.

E-KYC संदर्भात अदिती तटकरे काय म्हणाल्या?-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC करत असताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेले आहे, तंज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन देत आहे, असे त्या म्हणाल्या.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *