मोबाईलवरून आता आधार कार्ड अपडेट करता येणार; लवकरच नवीन ॲप लॉन्च होणार?

केंद्र शासन हे आधार कार्ड धारकांसाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणण्याच्या तयारीमध्ये आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) या मोबाईल ॲपची तयारी करत आहे. या ऑल इन अ‍ॅपमध्ये नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सहज व झटपट अद्यावत करता येणार आहे. त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावरती जाण्याची गरज भासणार नाही. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर माहिती आता या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तात्काळ अपडेट करता येणार आहे. हे मोबाईल अ‍ॅप एकाच डिजिटल इंटरफेसद्वारे आधार माहिती अपडेट करण्यासाठी एक सुलभ व सोयीस्कर प्लॅटफॉर्म तयार करून देणार आहे.

कधी लॉन्च होणार नवीन ईआधार अ‍ॅप-

सूत्रांच्या माहितीनुसार शासनाचे ईआधार अ‍ॅप्लिकेशन हे या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होणार आहे व या अ‍ॅपचा आधार कार्डधारकांना वापर करता येणार आहे. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर माहिती आता या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने तात्काळ अपडेट करता येणार आहे. त्यामुळे त्यांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टींसाठी आधार सेवा केंद्रावरती जाण्याची गरज भासणार नाही.

ई-आधार काय आहे?-

नवीन आधार मोबाईल ॲप्लिकेशन हे युझर्सला त्यांची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांना यामध्ये त्याची जन्मतारीख, त्याचे नाव व इतर माहिती अपडेट करता येणार आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप त्यांना वर्षाअखेरीस डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे आधार सेवा केंद्रावरील नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा(AI) चा वापर करून फेस आयडी तंत्रज्ञानाआधारे हे अ‍ॅप नागरिकांना सुरक्षित व सहजसोप्या पद्धतीने डिजिटल आधार सेवा पुरवणार आहे. देशाभरातील नागरिकांना त्यांच्या फोनवरील आधारच्या ऑल इन अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती सहज अपडेट करता येणार आहे.

अगोदर करावे लागेल हे काम-

आधार कार्ड अपडेट अ‍ॅपची सेवा सुरू करण्यासाठी स्मार्टफोन युझर्सला अगोदर आधारसेवा केंद्रावरती जावे लागणार आहे. नोव्हेंबरपासून त्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी व अ‍ॅपची सेवा मिळवण्यासाठी त्यांना बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांचे फिंगरप्रिंट व iris स्कॅनिंग करावी लागणार आहे. माहिती अपडेट करणे सहज व सुलभ व्हावे यासाठी हे नवीन ॲप लॉन्स करण्यात येणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *