राज्यातील पशुधन नुकसान भरपाईचे निकष?

राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. त्याचबरोबर मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील मांजरा, सिंदफना, सीना व इतर लहानमोठ्या नद्यांना पूर आलेले आहे. घरे, दुकाने, शेती, पिके पाण्याखाली गेलेली आहेत. त्याचबरोबर जनावरे वाहून गेलेली आहेत. यादरम्यान पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबरपर्यंत राज्यात 1 हजार 601 मोठी जनावरे, 1 हजार 799 लहान जनावरे व 54 हजार 338 कोंबड्यांची जीवितहानी झालेली आहे.

याचबरोबर मराठवाड्यात व पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जिवीतहानी होत आहे. पण एनडीआरएफकडून देण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे, पशुधनाच्या मरतुकीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे निकष पुढील प्रमाणे- दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी व वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या जनावरांसाठी नुकसान भरपाई देण्यात येते. परंतु यासाठी मर्यादा घालून देण्यात आलेले आहे.

म्हैस, गाय किंवा उंट या जनावरांसाठी 37 हजार 500 रुपये प्रती जनावर एवढी भरपाई देण्यात येणार आहे पण भरपाईची मर्यादा ही फक्त 3 जनावरांसाठीच आहे. यासोबत शेळी, मेंढी व वराहसाठी प्रती जनावर 4 हजारांची भरपाई देण्यात येणार आहे व जास्तीत जास्त 30 जनावरांची मर्यादा घालून देण्यात आलेले आहे. बैल, अश्र्व, उंट यांसाठी 32 हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे व जास्तीत जास्त 3 जनावरांची भरपाई दिली जाणार आहे.

वासरे, गाढव, शिंगरू, खेचरे व कालवडीसाठी प्रती जनावर 20 हजारांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे व यासाठी जास्तीत जास्त 6 जनावरांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कुक्कुटपालनातील 100 कोंबड्यांसाठी प्रति कोंबडी 100 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 3 पेक्षा जास्त जनावरे वाहून गेलेली आहेत, त्यामुळे प्रती जनावरे मिळणारी मदत कमी असल्याने शेतकऱ्यांनी या निकषाप्रमाणे मदत मिळाल्यावरती तोटा सहन करावा लागणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *