भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी पुण्यातील हिंजवडी हे एक आहे. हिंजवडी IT पार्कमध्ये शेकडो नॅशनल त्याचबरोबर इंटरनॅशनल आयटी कंपन्या आहेत. हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते. हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी व स्थानिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यांच्या सूचनांनुसार, उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चांबळी व कोडीत गावांमधील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केलेली आहे.
हिंजवडीला पायाभूत सुविधांमध्ये अडचणी येत आहेत. हिंजवडीमधील अनेक आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे हिंजवडी आयटी पार्कवरील ताण कमी करण्यासाठी नवीन आयटी पार्कची घोषणा करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे हिंजवडीला भेट दिली आहे व प्रशासनाला रस्ता रुंदीकरण व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिलेले आहेट. कारण विलंबामुळे कंपन्या स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने पुण्याच्या पुरंदर तालुक्यात एक नवीन IT पार्क उभरण्यास हिरवा कंदील दिलेला आहे. हिंजवडी IT पार्कवरती वाढता ताण व ट्रॅफिक समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय हा एप्रिल 2025 चा आहे. परंतु अंमलबजावणीची हालचाल आत्ता पुन्हा सुरू झालेली आहे. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडीत येथील जागांची पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. या गावांमधील 1500 एकर जागेवर हे IT पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत व पुरंदर परिसरातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना यामुळे मिळणार आहे. त्याचबरोबर हिंजवडीवरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत मिळणार आहे. औद्योगिक विकास महामंडळ(MIDC) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. तज्ञांच्या मते येत्या काही वर्षात पुरंदर हे पुण्याचे नवीन IT हब म्हणून ओळखले जाणार आहे.
नोट– महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.