लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे. भरपूर महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे परंतु भरपूर अशा महिला आहेत त्यांची ई-केवायसी बाकी आहे. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, जरी तुम्ही ई-केवायसी केलेली असली तरी सुद्धा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. आता त्या महिला नक्की आहेत तरी कोण? नक्की काय होणार आहे ते समजूण घेऊया. ई-केवायसी करण्यासाठी तुमचा त्याचबरोबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक मागितलेला आहे. जर विवाहित असेल तर पतीचा व अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक वापरायचा आहे. आता यांचा जो आधार नंबर आहे तो दिल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे हे सर्व चेक होणार आहे?व त्यामुळे काही महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत. त्यांना हप्ता मिळणार नाही. यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत, चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- या योजनेच्या लाभास पात्र असणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या व निराधार महिला त्याचबरोबर कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला या योजनेच्या लाभास पात्र असणार आहे.
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- लाभार्थ्यांकडे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, अशा महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि रु. 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. 1500/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत. अशा महिला अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहेत. अशा महिला अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. अशा महिला अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे. अशा महिला अपात्र ठरणार आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.