महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात नाफेड कांद्याची विक्री करत असल्यामुळे कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. नाफेडने याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग भारत सरकार यांच्या निर्देशनानुसार नाफेडणे या वर्षी फक्त महाराष्ट्र राज्यात फक्त 12 मेट्रिक टन कांद्याची विक्री केलेली आहे. यापेक्षा अधिक विक्री झालेली नाही. सध्या राज्यांमध्ये नाफेडकरून कांद्याची विक्री केली जात नसल्याचे ही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशनानुसार सातत्याने कार्यरत राहील असे सांगण्यात आलेले आहे. नाफेड अशा प्रकरणाच्या खोट्या बातम्या व अफवांचा तीव्र निषेध करते व त्याचबरोबर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आलेला आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.