नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास हा 15 सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी ही माहिती दिलेली आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानतून परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अशातच राज्यात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर उरलेल्या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
जोरदार पावसाचा इशारा हा रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा व सातारा घाटमाथा यांना देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. वादळी पावसाचा इशारा हा नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.